शिरूर : गावातील बीडगर वस्ती येथून रमेश अच्युत पवार (वय 45 वर्षे) हे पुरुष दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पवार हे 15 डिसेंबर रोजी सकाळपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता घरातून निघून गेले. नेहमीप्रमाणे ते घरी परत येतील, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी उषा पवार व कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ओळखीच्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला. सर्वत्र चौकशी करूनही रमेश पवार यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :
रंग काळा, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, अंगात निळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट, गळ्यात भगव्या रंगाचा रुमाल, चेहऱ्यावर काळी दाढी असून चालताना कंबरेत थोडे वाकलेले दिसतात. या संदर्भात रमेश पवार यांची पत्नी उषा पवार यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अधिकृत नोंद करण्यात आली आहे. शिरूर पोलिसांकडून सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आसपासच्या परिसरात तसेच संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, रमेश पवार यांच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या पत्नी उषा पवार (मो. 8087470218) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस प्रशासन व कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

