Explore

Search

August 18, 2026 7:36 pm

केम येथे १५ आॅगष्ट रोजी हनुमान चालीसा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

केम प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील केम येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण जयंत गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी सुरू आहे सकल हिंदू समाज व बजरंग यांच्या वतीने 15 ऑगस्ट या दिवशी हनुमान चालीसा ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त सकाळी आठ वाजता श्री अभिषेक सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व साडेसात ते साडेनऊ यावेळेस ह भ प बोराडे महाराज यांचे कीर्तन झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितले या कार्यक्रमातच कुर्डूवाडी येथील येथील ह भ प संतोष वाळुजकर महाराज यांचे चिंतन झाले त्यांनी यामध्ये गाय वाचवा देश वाचवा हा संदेश देण्यात आला यावेळी रामकृष्ण महाराज ह भ प वाडकर महाराज हनुमंत गिरी महाराज उपस्थित होते साडेनऊ वाजता करून हनुमान ची आरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी बजरंग दल व सकल हिंदू समाज बांधवांनी परिश्रम घेतले

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर