Explore

Search

June 21, 2026 12:31 am

जमिनीच्या पंचनाम्यासाठी ७ हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

शिरूर : पुणे जिल्ह्याच्या नेहमी चर्चेत असणाऱ्या शिरूर तालुक्यात जमिनीच्या पंचनाम्यास अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच मागून स्वीकारणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील ग्राम महसूल अधिकारी प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४) यांनी तक्रारदाराच्या जमिनीचा पंचनामा त्यांच्या बाजूने करून देण्यासाठी तसेच पुढील मदतीसाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष तडजोड होऊन ७ हजार रुपयांत व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यानुसार दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी छत्रपती संभाजी चौक, न्हावरे–तळेगाव रोड परिसरात वानखेडे यांनी पंचांसमक्ष ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक भारती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर