Explore

Search

October 17, 2026 5:50 am

शिरूर तालुक्यातून पाच लाखांची पिकअप गाडी अज्ञात चोरट्यांकडून चोरीस !

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे यमाई गावात अज्ञात चोरट्यांनी पिकअप गाडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ नजु जाधव (वय 24, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजल्यापासून ते 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत पार्क केलेली पिकअप गाडी चोरीस गेली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता लबाडीच्या इराद्याने ही गाडी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीस गेलेली पिकअप गाडी क्रमांक MH-14-HG-4415 असून तिची अंदाजे किंमत पाच लाख रुपये आहे. या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वारे करत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर