Explore

Search

October 17, 2026 5:50 am

गेवराई गुन्हे शाखेची धडक कारवाई

तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत जातेगावात ७.७५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ७ लाख ७५ हजार ५४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे जातेगाव ठिकाणी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे पुन्हा समोर आले असून, प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून होतो याचा शोध घेऊन वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 #गुठखा #कारवाई #गेवराई

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर