Explore

Search

December 25, 2025 11:11 pm

कोरेगाव भीमाजवळ भीषण अपघात; 59 वर्षीय महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

कोरेगाव भीमा : पुणे–अहिल्यानगर (अहमदनगर–पुणे) महामार्गावर कोरेगाव भीमा परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात 59 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे कोरेगाव भीमा परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन फाटा ( फरची ओढयजवळ ) परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. या अपघातात नीलम रामचंद्र दाभाडे (वय 51 , रा. मांजरी बुद्रुक, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती रामचंद्र दाभाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस, बचाव पथक व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या दरम्यान काही काळ या मार्गावरील वाहतूक कोंडी व विस्कळीत झाली होती.

प्राथमिक तपासात कारचा वेग अधिक असल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असतानाही योग्य सूचना फलक किंवा सिग्नल नसल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर