Explore

Search

October 17, 2026 6:33 am

शिरूर तालुक्यात भरधाव दुचाकीची धडक; शेतकऱ्याच्या पायल गंभीर दुखापत !

आलेगाव पागा : शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने पायी चालणाऱ्या शेतकऱ्यास पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात संबंधित शेतकऱ्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे.

फिर्यादीनुसार, दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दादा ढोले हे आलेगाव पागा ते रांजणगाव सांडस रस्त्याने पायी आपल्या शेताकडे जात असताना, रस्त्याच्या कडेला चालत असताना एका अज्ञात मोटरसायकलस्वाराने भरधाव वेगात वाहन चालवत पाठीमागून त्यांना धडक दिली. अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा दिनकर ढोले (वय 58, व्यवसाय शेती, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या अपघातात दादा ढोले यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास पोसई बनकर हे करीत आहे. पोलीस अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेत असून नागरिकांनी अपघाताबाबत काही माहिती असल्यास शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर