Explore

Search

June 20, 2026 11:25 pm

शिरूर तालुक्यात विहिरीतील पानबुडी मोटर चोरी !

निर्वि : शिरूर तालुक्यातील मौजे निर्वी परिसरात अज्ञात चोरट्याने विहिरीतील पानबुडी मोटर व पाईप चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सुभाष बापुराव सोनवणे (वय ६२, व्यवसाय शेती, मूळ रा. निर्वी ता. शिरूर, सध्या रा. शाहुनगर, चिंचवड, पुणे) यांच्या मालकीच्या गट नं. ५६५ मधील विहिरीत नवीन बसवलेली टेक्मो कंपनीची ५ एच.पी. क्षमतेची निळ्या रंगाची पानबुडी मोटर व त्यास जोडलेला ३५ फूट लांबीचा ४ इंच साईजचा काळ्या रंगाचा पाईप अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला.

दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.०० वाजेपर्यंत फिर्यादींच्या वाटेकऱ्याने शेतात पाणी दिले होते. त्यानंतर रात्री २३.०० वाजण्याच्या सुमारास पुन्हा पाणी देण्यासाठी गेल्यावर मोटरला जोडलेला काळा पाईप कापलेला तसेच वायर कट केलेली असल्याचे निदर्शनास आले. विहिरीत पाहणी केली असता मोटर व पाईप गायब असल्याचे आढळून आले.

चोरीस गेलेल्या मालाची एकूण अंदाजे किंमत सुमारे ३१ हजार ७५० रुपये इतकी आहे. या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे करत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर