Explore

Search

March 22, 2026 4:29 am

कोरेगाव भीमा रणस्तंभ परिसरात 2026 साठी जय्यत तयारी पूर्ण; 1 जानेवारीची उत्सुकतेने प्रतीक्षा !

शिरूर | प्रतिनिधी : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक रणस्तंभ परिसरात 2026 साठी येणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून आता 1 जानेवारीची नागरिक उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी कोरेगाव भीमाला भेट देणार आहेत.

प्रशासनाच्या वतीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियोजन, सीसीटीव्ही देखरेख, वैद्यकीय पथके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी नियंत्रण कक्षही कार्यरत ठेवण्यात आला आहे. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा लढाईच्या स्मरणार्थ उभारलेला रणस्तंभ हा शौर्य, स्वाभिमान आणि सामाजिक समतेचे प्रतीक आहे. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर