Explore

Search

March 22, 2026 4:32 am

न्हावरा आठवडी बाजारात ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस !

शिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या न्हावरा येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल फोन, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बाळकृष्ण विठ्ठल जगताप (वय ७३, व्यवसाय – सेवानिवृत्त शिक्षक, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास न्हावरा येथील आठवडी बाजारात सफरचंद खरेदीसाठी गेले असता, त्यांच्या शर्टच्या खिशातून अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये विवो कंपनीचा Y28 E 5G मोबाईल फोन (अंदाजे किंमत ५,००० रुपये), मोबाईल सिम क्रमांक ९४०३३५३८५८, रोख रक्कम २,००० रुपये ( ५०० रुपयांच्या चार नोटा ) तसेच मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेले पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व फिर्यादी तसेच त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड यांचा समावेश आहे. एकूण चोरीचा मुद्देमाल सुमारे ७,००० रुपयांचा आहे. या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पवार करत असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर