Explore

Search

March 27, 2026 5:21 am

‘लाव रे तो व्हिडीओ’चा शिवतीर्थावर गाजावाजा; फडणवीसांकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टोला !

मुंबईतील शिवतीर्थ येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केलेल्या अनोख्या राजकीय खेळीने सभास्थळी एकच खळबळ उडाली. “लाव रे तो व्हिडीओ,” असे म्हणत फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पूर्वी एकमेकांवर केलेल्या टीकेचे जुने व्हिडीओ थेट सभेत दाखवले.

या व्हिडीओंच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनीच एकमेकांबाबत काय भूमिका घेतली होती, हे जनतेसमोर मांडले असल्याचा दावा करत फडणवीसांनी दोघांनाही चांगलंच डिवचलं. “उत्तर मी नाही, तर त्यांनीच एकमेकांना दिलं आहे,” असे म्हणत त्यांनी या साऱ्या घडामोडींकडे लक्ष वेधले.

या प्रसंगानंतर मतदारांनाच निर्णय घेण्याचे आवाहन करत, “आता सत्य तुमच्यासमोर आहे, काय करायचं ते तुम्हीच ठरवा,” असे स्पष्ट मत फडणवीसांनी व्यक्त केले. त्यांच्या या आक्रमक शैलीमुळे आणि थेट सादरीकरणामुळे सभेतील वातावरण तापले असून, राज्यातील राजकीय प्रचार अधिक धारदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर