Explore

Search

March 27, 2026 5:18 am

शिरूर हद्दीत कारचा कंटेनरला धडक देत अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली !

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता अपघाताची नोंद करण्यात आली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी किशोर गणेशलाल सरवैये (वय ६६, रा. बसैयेनगर, संभाजीनगर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिरूर तालुक्यातील नाना स्पॉटजवळ हा अपघात घडला. फिर्यादी किशोर सरवैये हे आपल्या पत्नी, नातेवाईकांसह पुणे येथे अंत्यविधीसाठी गेले होते. तेथील विधी आटोपून संभाजीनगरकडे परतत असताना, त्यांनी स्वतः चालवत असलेली चारचाकी आय-१० कार (क्रमांक MH 20 BY 2126) शिरूर हद्दीत उतरत्या रस्त्यावर आली असता, पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने ओव्हरटेक करताना कारला उजव्या बाजूने कट मारला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर रस्त्यावर कोणताही सिग्नल किंवा अडथळा न लावता उभ्या असलेल्या कंटेनर (क्रमांक HR 38 AD 6330) ला कार जोरात धडकली.

या अपघातात कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र कारचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर करीत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर