Explore

Search

February 4, 2026 6:18 am

शिरूर शहरात एमडी अंमली पदार्थ जप्त; 2 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

शिरूर (जि. पुणे) : शिरूर शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई करत पुणे ग्रामीण पोलीस यांनी 1 किलो 52 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 2 कोटी 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरूर शहरातील बाबूरावनगर परिसरात सापळा रचण्यात आला. दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून शादाब रियाज शेख (वय 41, व्यवसाय – गॅरेज चालक, रा. डुंबेनाला, शिरूर) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून 1 किलो 52 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ, एक हिरो होंडा पॅशन मोटारसायकल असा एकूण 2,10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात पुढील तपास सुरू असून, या अंमली पदार्थांच्या साखळीमागील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोसई शुभम चव्हाण करत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर