Explore

Search

October 17, 2026 7:13 am

शिरूर तालुक्यात बांधकामाच्या वादातून मारहाण; एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावात घरासमोरील संडास-बाथरूमच्या बांधकामावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष भाऊसाहेब लोखंडे (वय ६४, व्यवसाय मजुरी, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोर बसले होते. त्यावेळी त्यांचे भाऊ रोहिदास भाऊसाहेब लोखंडे हे तेथे आले. घरासमोरील संडास-बाथरूमचे काम सुरू असताना आरोपीने तेथे काम करणाऱ्या गवंड्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.  तसेच संडासच्या पाईपचे नुकसान केले.

फिर्यादींनी नुकसान का करत आहात आणि कामगाराला शिवीगाळ का करत आहात, असे विचारले असता आरोपीने ही जागा आपली असल्याचा दावा करत बांधकाम करण्यास विरोध केला. यानंतर आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून तेथे पडलेल्या लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हाताला, पाठीला व छातीला दुखापत झाली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत संडासच्या पाईपचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी ६ जानेवारी २०२६ रोजी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर