Explore

Search

February 9, 2026 9:38 am

शिक्रापुर पोलिसांकडून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद !

शिक्रापुर (प्रतिनिधी) :  परिसरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिक्रापुर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाखों रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

शिक्रापुर पोलीस ठाण्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शिक्रापुर–फलटण मार्गावरील फाकटे परिसरात संशयास्पद व्यक्ती चोरीच्या दुचाकीसह येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी रितेश फकिरा रोकडे ( वय. 18 चांडोह, ता. शिरूर,पुणे ), हर्षद जालिंदर ढवळे ( वय. 21, फाकटे, ता. शिरूर,पुणे ), प्रकाश दत्तात्रय ढवळे ( वय.19, फाकटे, ता. शिरूर,पुणे ), तीन जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी विविध ठिकाणांहून अनेक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

यापूर्वी २५ डिसेंबर २०२५ रोजी जगरवाडी, ता. आंबेगाव येथून एका नागरिकाची अॅक्टिव्हा स्कूटी चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अखेर चोरी करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या कामगिरीत सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे आणि अविनाश कालेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शिक्रापुर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, चोरीच्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर