Explore

Search

June 21, 2026 12:32 am

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत भाजपचा दबदबा; २९ पैकी २६ महापालिकांत आघाडी !

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना राज्याच्या राजकारणात मोठा बदल दिसून येत आहे. सध्याच्या कलांनुसार भारतीय जनता पक्ष (भाजप) ने २९ पैकी तब्बल २६ महापालिकांमध्ये आघाडी घेतली असून, राज्यभर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात भाजपने भक्कम पकड निर्माण केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने निर्णायक आघाडी मिळवली आहे. त्याचप्रमाणे वसई–विरार महापालिकेतही भाजपची आघाडी कायम असून, पक्षाचा विस्तार शहरी भागात अधिक मजबूत होताना दिसत आहे.दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्येही महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. १७६ जागांसाठीच्या कलांनुसार भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीने ९२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर ठाकरे बंधूंचा गट ६७ जागांवर आघाडीवर आहे.

हे निकाल महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांकडे स्पष्टपणे निर्देश करत असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर