Explore

Search

July 15, 2026 2:41 am

मराठा आरक्षणासाठी बलीदान : मते कुटुंबियांना१०लाखांची शासनाकडून मदत .

मराठा आरक्षणासाठी बलिदान: मते कुटुंबियांना १० लाखांची शासनाकडून मदत.

 

मराठा आरक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणारे रामेश्वर मते यांच्या कुटुंबियांना अखेर शासनाकडून आर्थिक मदतीचा धनादेश प्राप्त झाला आहे.

१४ मे २०२४ रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती.

 

आज तहसील कार्यालय, गेवराई येथे ही मदत रक्कम नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांच्या हस्ते, स्वर्गीय रामेश्वर मते यांच्या पत्नी सुरेखा रामेश्वर मते यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली.

 

यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी, पत्रकार उपस्थित होते. बळीराजाच्या कुटुंबाला मिळालेल्या या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी रामेश्वर मते यांचे बलिदान गेवराईवासीय कधीही विसरणार नाहीत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर