Explore

Search

October 17, 2026 6:31 am

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ₹80 हजारांची मदत श्री बापूसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ₹80 हजारांची मदत

शिरूर, प्रतिनिधी :

सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मा. श्री. बापूसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश आले आहे.

वाघाळे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील सौ. रूपाली राजेंद्र शेळके यांना मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून दि. 21 जुलै 2026 रोजी ₹80,000/- इतका निधी मंजूर झाला आहे.

सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य बापूसाहेब शिंदे सातत्याने करत असून, अनेक गरजू रुग्णांना त्यांच्या प्रयत्नांमुळे आर्थिक आधार मिळाला आहे. या मदतीमुळे शेळके कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी बापूसाहेब शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी बापूसाहेब शिंदे यांनी, “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपले कार्य भविष्यातही अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

मा. श्री. बापूसाहेब कांतीलाल शिंदे हे मातोश्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असून सामाजिक, आरोग्य व जनकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत

1 thought on “मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ₹80 हजारांची मदत श्री बापूसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश”

  1. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ₹80 हजारांची मदत

    Reply

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर