Explore

Search

October 17, 2026 6:29 am

ट्रोलिंगवर स्मृती इराणींचा संताप; ‘सार्वजनिक जीवनात आल्यावर प्रतिष्ठेचा अधिकार गमावला का?’

मुंबई : सोशल मीडियावर सार्वजनिक जीवनातील व्यक्ती आणि सेलिब्रिटींना लक्ष्य करून होणाऱ्या ट्रोलिंगच्या वाढत्या प्रकारांवर अभिनेत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतील सहकलाकारांसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी ट्रोलिंगच्या प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले.

सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांना आपले मत मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र, या स्वातंत्र्याचा वापर काही जण इतरांचा अपमान करण्यासाठी आणि त्यांना दुखावण्यासाठी करत असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

‘प्रतिष्ठेचा अधिकार गमावला का?’

सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी टीका आणि ट्रोलिंग सहनच करावे, अशी अपेक्षा का केली जाते, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. मतभेद व्यक्त करणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असला तरी टीकेच्या नावाखाली व्यक्तीचा अपमान करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“सार्वजनिक जीवनात प्रवेश केला म्हणून एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या प्रतिष्ठेचा अधिकार गमावला आहे का? कुणाकडूनही अपमान मुकाटपणे सहन करण्याची अपेक्षा का केली जावी?” असा सवाल त्यांनी केला.

‘चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका’

स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील कलाकार ट्रोलिंगविरोधात संदेश देताना दिसत आहेत. या माध्यमातून सोशल मीडिया वापरकर्त्यांना संयमाने व्यक्त होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“कुणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल, तर निदान वाईट तरी बोलू नका. आमचं नाही तर किमान सलमान खान यांचं तरी ऐका. चांगलं बोला, चांगलं वाटेल,” असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.

‘माझं हँडल, माझं मत’ म्हणजे क्रूरतेचा परवाना नाही

फेक अकाउंट, बॉट किंवा स्वतःच्या नावाने सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तींनीही इतरांविषयी अपमानास्पद किंवा क्रूर भाषा वापरण्याचे समर्थन करू नये

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर