Explore

Search

October 17, 2026 6:07 am

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; दोन मंडळांच्या अध्यक्षांसह सिस्टीम मालकांवर गुन्हा !

हातकणंगले, ता २२ (प्रतिनिधी)- कुंभोज (ता. हातकणंगले) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मिड्सचा वापर करून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन मंडळांच्या अध्यक्षांसह सिस्टीमचे मालक ऑपरेटर आणि वाहन चालक अशा सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकून ६६ लाख रुपयांच्या वाहनासह यंत्रसामुग्री हातकणंगले पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतची फिर्याद पो. कॉ. शंतनू प्रकाश देसाई यांनी दिली.

जय हिंद युवक मंडळावर केलेल्या कारवाईत मंडळाचे अध्यक्ष प्रताप मल्हारी जगदाळे (वय २३, रा. कुंभोज), साऊंड सिस्टीमचे मालक व ऑपरेटर अभिषेक रविंद्र चव्हाण (वय ३० रा. म्हसवे जि. सातारा), वाहन चालक मोहसिन आयूब मणेर (वय ४० रा. भूईज, जि. सातारा) अशी गुन्हे दाखल झालेल्या तिघांची नावे असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किंमतीचा ट्रक (एमएच ३४ बीझेड ०५२९), १७ लाख रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम असा एकूण २१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल तर बालाजी तरुण मंडळावर केलेल्या कारवाईत मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भिमराव हराळे (वय २९ रा. कुंभोज), साऊंड सिस्टीमचे मालक व ऑपरेटर अक्षय बाजीराव तोत्रे (वय २९, रा. सांडोली, जि. पुणे), ट्रक चालक निखिल राजू गायकवाड वय ३० रा. मलठन, जि. पुणे) अशी गुन्हे दाखल झालेल्या तिघांची नावे असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किंमतीचा ट्रक (एमएच ४ एफयु ३०५६) व ४० लाख रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम असा ४४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर