खेड : खेड तालुक्यातील कळंबणी-थोरेवाडी येथे ७६ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २१ सप्टेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागोजी सखाराम घाणेकर (वय ७६, रा. कळंबणी, थोरेवाडी, ता. खेड) यांनी आपल्या राहत्या घराच्या पडवीतील लोखंडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात आली. घाणेकर हे आजारपण तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आली आहे. याच कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

