Explore

Search

October 17, 2026 6:06 am

दारू पाजल्याचा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवल्याच्या रागातून महिलेला शिवीगाळ; इंदापूरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा !

इंदापूर : दारू पाजल्याचा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील सराटी गावच्या हद्दीत घडल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 26 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील फिर्यादी संजना धनाजी कोकाटे (वय 55, व्यवसाय गृहिणी, रा. सराटी, ता. इंदापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी व ठिकाणी संबंधित व्यक्तींना दारू पाजल्याचा व्हिडिओ काढण्यात आला होता. हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्यात आला. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादीशी वाद घालत तिला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पांडुरंग भारत कोकाटे, ओम दीपक कोकाटे, किसान गजेंद्र कोकाटे, राजवर्धन दत्तात्रय कोकाटे आणि छाया भारत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कलमांनुसार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर