Explore

Search

October 17, 2026 6:07 am

‘मला का मारतोस?’ विचारल्याच्या रागातून दगडाने डोक्यात मारहाण; भोरमध्ये जीवे मारण्याची धमकी !

भोर : ‘मला का मारतोस?’ असा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून तसेच शेतीच्या कामातील साहित्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भोर तालुक्यातील पसुरे येथे घडली. या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, घटना 27 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता पसुरे, ता. भोर, जि. पुणे येथील तळजाईनगरच्या रस्त्यावर घडली. या प्रकरणी लहू रामचंद्र गोरे (वय 30, व्यवसाय शेती, रा. पसुरे, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ते संबंधित ठिकाणी असताना आरोपी अशोक दत्तात्रय मळेकर याच्याशी त्यांचा वाद झाला. ‘तू मला का मारणार आहेस?’ अशा आशयाचे विचारले असता आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारल्याचा आरोप आहे.त्यानंतर आरोपीने शेतीच्या कामातील वस्तूने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारहाण केली. यामध्ये फिर्यादीला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

या घटनेनंतर भोर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर