Explore

Search

October 17, 2026 5:27 am

शिरूरमध्ये विद्यार्थिनीला Snapchat वरून अश्लील फोटो पाठवून धमकी; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

शिरूर ( प्रतिनिधी ) : शिरूर शहर परिसरातील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा Snapchat वरून सायबर छळ केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने विद्यार्थिनीला अश्लील फोटो पाठवून, तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनी शिरूर शहर हद्दीतील संगम हॉटेल परिसरात घरी असताना “vishalkhatpe26” या Snapchat अकाउंटवरून तिच्या अकाउंटवर अश्लील स्वरूपाचा फोटो पाठविण्यात आला.यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीने विद्यार्थिनीशी संपर्क साधत तिचे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगितले. तसेच हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा वेबसाईटवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडे खासगी स्वरूपाचे फोटो व व्हिडिओ मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याशिवाय, संबंधित व्यक्तीने विद्यार्थिनीला भेटण्यासाठी येण्याची मागणी केली. भेटण्यास न आल्यास तिच्याकडून पाठविलेले व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “vishalkhatpe26” हे Snapchat अकाउंट चालविणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आगलावे करीत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर