रिसोड ( तालुका प्रतिनिधी ) : रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. नाल्याची वेळेवर साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी नाल्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या घरांतील नागरिक हैराण झाले आहेत. साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.नाल्यांची स्वच्छता, कचरा हटविणे आणि सार्वजनिक परिसरात आवश्यक स्वच्छता उपाययोजना करणे ही ग्रामपंचायतीची मूलभूत प्रशासकीय जबाबदारी आहे. मात्र, खडकी सदार येथील नाल्याच्या सद्यस्थितीवरून या जबाबदारीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
जबाबदारी निश्चित करून तातडीने कार्यवाहीची गरज नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची वाट नपाहता ग्रामपंचायतीने नाल्याची तातडीने साफसफाई करणे, साचलेला कचरा हटविणे, डास प्रतिबंधक उपाययोजना करणे आणि पुढील काळात नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने या कामाची जबाबदारी निश्चित करून त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर देखरेख करणे गरजेचे आहे. “नाला साफ करण्यासाठी नेमका मुहूर्त कधी?” हा प्रश्न आता केवळ नागरिकांचा राहिलेला नसून ग्रामपंचायत प्रशासनाने त्याचे उत्तर कृतीतून देण्याची वेळ आली आहे. स्वच्छता न झाल्यास नागरिकांनी संबंधित वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करून या प्रश्नाचा पाठपुरावा करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
खडकी सदारच्या नाल्यात घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप दुर्गंधीने नागरिक त्रस्त; डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
व कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. नाल्याची वेळेवर साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी नाल्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या घरांतील नागरिक हैराण झाले आहेत. साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होतआहे.
नाल्यांची स्वच्छता, कचरा हटविणे आणि सार्वजनिक परिसरात आवश्यक स्वच्छता उपाययोजना करणे ही ग्रामपंचायतीची मूलभूत प्रशासकीय जबाबदारी आहे. मात्र, खडकी सदार येथील नाल्याच्या सद्यस्थितीवरून या जबाबदारीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
जबाबदारी निश्चित करून तातडीने कार्यवाहीची गरज नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची वाट न पाहता ग्रामपंचायतीने नाल्याची तातडीने साफसफाई करणे, साचलेला कचरा हटविणे, डास प्रतिबंधक उपाययोजना करणे आणि पुढील काळात नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने या कामाची जबाबदारी निश्चित करून त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर देखरेख करणे गरजेचे आहे.
सचिन सदार
“नाला साफ करण्यासाठी नेमका मुहूर्त कधी?” हा प्रश्न आता केवळ नागरिकांचा राहिलेला नसून ग्रामपंचायत प्रशासनाने त्याचे उत्तर कृतीतून देण्याची वेळ आली आहे. स्वच्छता न झाल्यास नागरिकांनी संबंधित वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करून या प्रश्नाचा पाठपुरावा करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.

