Explore

Search

October 17, 2026 6:30 am

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; ग्रामस्थांचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

 

धुळे ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील चिंचवार गावासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून नवीन पाटचारी तातडीने काढण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चिंचवार गावापासून अक्कलपाडा धरणाचे डाव्या कालव्याचे अंतर साधारण दोन ते अडीच किलोमीटर आहे. या अंतरावरून चिंचवार शिवारातील शामल शेवडी (रंकेश तलाव) या मार्गाने तात्काळ पाटचारी काढल्यास गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते.

गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी होत चालल्याने नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, आता विलंब झाल्यास ग्रामस्थांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून नवीन पाटचारी करुन पाणी सोडल्यास परिसरातील जलस्रोतांना मोठा आधार मिळू शकतो. पाटचारीत पाणी आल्याने विहिरी, बोअरवेल तसेच अन्य जलस्रोतांची पाणीपातळी वाढण्यास मदत होऊन चिंचवार गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास हातभार लागेल,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सध्या गावातील पाणीप्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाने विलंब न करता

नवीन पाटचारीसाठी तातडीने पाहणी करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित श्री गंगाराम पाटील,रतिलाल मासुळे, अधिकार पाटील(बंन्टी),आनंदा मासुळे, कैलास महाजन,शरिफ पटेल,दत्तु पाटील, प्रवीण जाधव,संजु पटेल,आरिफ पटेल,ईसामु पटेल, दादा महाजन व अदि ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर