Explore

Search

October 17, 2026 7:12 am

शिरूरमध्ये तीन पानी जुगारावर पोलिसांची धाड; चौघांवर गुन्हा दाखल !

शिरूर : शिरूर शहरात तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम, पत्त्यांचे दोन कॅट आणि एक बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील जगदंब चायनिजच्या शेजारी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही जण तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी राहुल भाउसाहेब सोनवणे (वय २४), रोहन राजू पवार (वय १९), रविराज गोरख गव्हाणे (वय २८) आणि महादेव मच्छिंद्र मोरे (वय ३२) हे चौघे जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १२ हजार ५५० रुपये रोख, पत्त्यांचे दोन कॅट आणि एक बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश संभाजी गोसावी यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार शिंदे यांनी केली.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर