Explore

Search

October 24, 2026 4:54 pm

गेवराईत पदवीधर संवाद मेळावा उत्साहात; सुप्रिया सुळे यांची उपस्थिती !

गेवराई | प्रतिनिधी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ गेवराई येथे पदवीधर संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदवीधरांच्या समस्या, शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या भविष्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या वेळी बोलताना डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नेत्यांना आवाहन केले की, “मराठवाड्यातील नेत्यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा देऊन पदवीधरांचे नुकसान करू नये.” पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

“पदवीधरांनो, तुमचे प्रश्न हेच माझे प्रश्न आहेत. तुमच्या हक्कांसाठी लढणे ही माझी जबाबदारी आहे. शिक्षण, रोजगार आणि पारदर्शक भरती प्रक्रिया या मुद्द्यांवर मी सातत्याने प्रयत्न करत राहीन,” अशी भूमिका डॉ. पाटील यांनी यावेळी मांडली.

मेळाव्यात उपस्थित पदवीधरांनी आपल्या विविध समस्या आणि अपेक्षा मांडल्या. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला.

या कार्यक्रमाला बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवीधरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर