Explore

Search

December 25, 2025 8:09 pm

रांजणगाव गणपतीत भाजपला बळकटी : सरपंच सुवर्णा वायदंडेंचा भाजप प्रवेश, जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग !

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : येथील सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने रांजणगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर तसेच उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी भाजपची वाट धरली असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यास पाचुंदकर कुटुंबीयांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे.

सरपंच सुवर्णा वायदंडे यांच्या भाजप प्रवेशामुळे रांजणगाव गणपती गावासह संपूर्ण जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद वाढली आहे. ग्रामपंचायत पातळीवर प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या वायदंडे यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून रांजणगाव जिल्हा परिषद गटात सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये या बदलांचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर