Explore

Search

February 9, 2026 6:43 am

मुंबई महापालिका निवडणूक 2026: भाजप–शिंदे शिवसेनेत 207 जागांवर एकमत, 20 जागांचा निर्णय प्रलंबित !

मुंबई : महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील जागा वाटपाबाबत मोठा तोडगा निघाला आहे. एकूण 227 जागांपैकी 207 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली असून उर्वरित 20 जागांबाबत अंतिम चर्चा लवकरच होणार आहे.

ठरलेल्या सूत्रानुसार भाजप 128 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 79 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने जागा वाटपाचा निर्णय अधिक काळ लांबवू नये, यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून भाजपने यंदा या निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याचा फायदा घेत महायुतीत एकसंघपणे निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना आणि महायुतीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त प्रचारसभा आणि रॅलींच्या आयोजनावरही चर्चा झाली. 207 जागांवर जागा वाटप निश्चित झाले असून उर्वरित 20 प्रभागांबाबत वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनीही जागा वाटपावर सहमती झाल्याची पुष्टी केली आहे. उर्वरित 20 जागांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर