शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात असलेला एक 19 वर्षीय युवकाच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ललीतकुमार गुलाबसिंग (वय 19 वर्षे), रा. हुडको कॉलनी, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे हा युवक दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
बेपत्ता युवकाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : रंग निमगोरा, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, शिक्षण 11 वी. उजव्या हातावर “ॐ” गोंदलेले आहे तसेच मानेच्या उजव्या बाजूस काळी जन्मखुण आहे. केस मध्यम असून चेहरा उभा आहे. गळ्यात काचेची माळ असून उजव्या हातात “ॐ नमः शिवाय” असे लिहिलेले पांढरे ब्रेसलेट आहे. बेपत्ता होताना त्याने काळी नाईट पँट, क्रीम रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट व पायात सँडल परिधान केले होते.
बेपत्ता युवकाचे वडील गुलाबसिंग हाकिमसिंग (वय 43 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. हुडको कॉलनी, शिरुर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा नेहमी त्यांच्यासोबत कामासाठी येत असतो, मात्र सदर दिवशी तो कामावर न आल्याने नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे शिरुर पोलिस ठाण्यात दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.49 वाजता मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भगत (पो हवा/98) करीत असून दाखल अंमलदार पोलीस हवालदार मोरे (पो हवा/1572) आहेत. सदर प्रकरणात प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत. सदर युवकाबाबत कोणाला काही माहिती असल्यास शिरुर पोलिस स्टेशन किंवा मो. नं. 8623886148 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

