Explore

Search

June 26, 2026 12:24 am

शिरूर येथे शेतकऱ्यावर मिरची पूड टाकून काठीने हल्ला !

ai generated

शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शहरात शेतातून घरी परतणाऱ्या एका ज्येष्ठ शेतकऱ्यावर अज्ञात कारणावरून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुडलिक गोविंद गोरे (वय ६५, व्यवसाय – शेती, रा. बाबुराव नगर, मधुकोश विंडिंग, शिरूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बोप्हाडेमळा येथील शेतीत काम करून ते घरी जात असताना शिरूर गावच्या हद्दीत, पुर्या बिअर शॉपीजवळ, बाबुराव नगर परिसरात ही घटना घडली. फिर्यादीच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या सुनिल सुरेश घावटे (रा. बो-हाडे  मळा, घावटेवस्ती पुढे, शिरूर) याने अचानक त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. त्यानंतर लाकडी काठीने मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात पुडलिक गोरे यांना दुखापत झाली आहे. या घटनेनंतर जखमी शेतकऱ्याने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस  अंमलदार पी हवालदार कोथळकर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. 

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर