Explore

Search

October 17, 2026 4:12 am

शिरूर बायपासवर ट्रक-टेम्पोचा भीषण अपघात; २४ वर्षीय टेम्पो चालकाचा मृत्यू

शिरूर : शिरूर बायपास रोडवरील टोरेंट गॅस पंपाजवळ ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात २४ वर्षीय टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात योगेश बाबासाहेब वालतुरे (वय २४, रा. भानसहिवरा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वीच योगेश वालतुरे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.

या घटनेबाबत मयताचे नातेवाईक दत्तात्रय शंकर नवले (वय ४७, रा. भानसहिवरा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १५६/२०२६ नोंद करण्यात आली आहे. ही नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर करीत असून, पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर