उमरगा (ऋषिकेश सुरवसे) : वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजोपयोगी उपक्रमासाठी करण्याचा आदर्श उमरगा शहरात पाहायला मिळाला. नगरसेविका अश्विनीताई सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त किंग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने परिसरातील आठ अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
सारनाथ बौद्ध विहार येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू बालकांना शैक्षणिक साहित्य तसेच कपडे उपलब्ध करून देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
दरम्यान, नगरसेविका अश्विनीताई सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या आगामी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिला लोकप्रतिनिधींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. नगरसेविका आरतीताई शिंदे, स्वातीताई स्वामी, सुप्रिया घोडके आणि प्रिया पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ सोनकांबळे, सनी सोनकांबळे, वंदना कटके, प्रियंका साबने, कविता सोनकांबळे, संतोशी सुरवसे, गोगलाबाई सरपे, जयश्री सरपे, विमल बनसोडे, आशा सरपे, तेजाबाई सरपे, शोभा कांबळे, शरद पवार, बालाजी सुरवसे, विश्वास सोनकांबळे, सचिन माने, प्रशांत कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि बौद्ध विहारातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.किंग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने वाढदिवसाचे औचित्य साधून राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शहर परिसरात कौतुक होत आहे.

