Explore

Search

October 17, 2026 6:30 am

आंबेगाव तालुक्यात घरफोडी; सव्वा लाखांची रोकड आणि मोबाईल चोरीला !

मंचर (ता. आंबेगाव) : महाळुंगे पडवळ येथील देसावळा परिसरात अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश करत सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची रोकड आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ही चोरी मंगळवारी (दि. २३) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (दि. २४) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्याने घराच्या खिडकीची जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून १ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम घेतली. तसेच टीव्हीसमोर ठेवलेला ओप्पो कंपनीचा मोबाईलही चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी अनिल पंढीनाथ आवटे (वय ६२, व्यवसाय – शेती, रा. देसावळा, महाळुंगे पडवळ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर