हातकणंगले ( प्रतिनिधी रईस मुजावर ) : इचलकरंजी महानगरपालिकेने सुरू केलेल्या बससेवेमुळे तालुक्यातील कुंभोज , हिंगणगाव ,नेज,शिवपुरी या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इचलकरंजी शहराशी विविध गावांना जोडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना या बससेवेचा दिलासा मिळाला आहे.
हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांचा इचलकरंजी शहराशी दैनंदिन संपर्क असतो. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा तसेच अन्य विविध कामांसाठी नागरिकांना इचलकरंजीला जावे लागते. मात्र, नियमित व पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने अनेकदा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेने सुरू केलेली बससेवा
कुंभोज येथे इचलकरंजी महापालिकेच्या बसेस येत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागाला शहराशी, गावागावाशी जोडणारी ही बससेवा केवळ प्रवासाचे साधन न राहता शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि व्यवसायाच्या संधींपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. महापालिकेने दैनंदिन वेळापत्रक, धावणाऱ्या बसेसची माहिती व बसेसवर रूटबोर्ड उपलब्ध करून दिल्यास सोयीचे ठरणार आहे.
सागर कांदेकर माजी उप सरपंच, ग्रामपंचायत कुंभोज
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची व वरदान ठरत आहे. बससेवेमुळे गावातून शहरात जाणे अधिक सोयीचे झाले असून, वेळेची बचत होत आहे. दररोज शिक्षणासाठी
शहरात जाणारे विद्यार्थी, व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सेवेचा फायदा होत आहे. दरम्यान, बससेवेचे वेळापत्रक नियमित ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

