Explore

Search

October 17, 2026 5:02 am

सोयाबीनच्या शेतात गाय आल्याने वाद; बाप-लेकीने शेतकऱ्याला मारहाण केल्याची तक्रार !

खेड : शेतातील सोयाबीन पिकात गाय आल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना खेड तालुक्यातील चास येथे घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 27 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता चास, ता. खेड, जि. पुणे येथील हाडको नावाच्या शेतात घडली. या प्रकरणी संदीप सखाराम गायकवाड (वय 52, व्यवसाय शेती, रा. चास बौद्धवस्ती, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी क्रमांक एकाच्या गायी फिर्यादीच्या सोयाबीनच्या शेतात आल्या होत्या. यावरून फिर्यादीने गायी शेतात आणू नयेत, असे सांगितले. याच कारणावरून वाद निर्माण झाला.या वादाच्या वेळी आरोपीची मुलगी काजल रविंद्र गायकवाड हिने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी रविंद्र नामदेव गायकवाड याने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत हातातील लाकडी काठीने डाव्या हातावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत फिर्यादीला दुखापत झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर