Explore

Search

October 17, 2026 3:26 am

दापोलीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; रोकडसह साहित्य जप्त, एकावर गुन्हा !

दापोली : शहरात सुरू असलेल्या बेकायदा मटका जुगारावर दापोली पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दापोली एसटी बसस्थानकासमोरील स्वागत हॉटेलच्या मागील बाजूस, स्टेपीन बारजवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली. यावेळी संबंधित व्यक्ती नागरिकांकडून पैसे स्वीकारून कोणताही परवाना नसताना मटका जुगार चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या प्रकरणी तुकाराम नारायण जुवळे (वय ३५, रा. दापोली, आदर्श शाळेच्या मागील बाजूस) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १ हजार ५० रुपयांची रोकड आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जगदीश सुरेश आंबवणे यांनी फिर्याद दिली आहे.दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१३/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर