Explore

Search

October 17, 2026 3:26 am

रिसोडचे ग्रामदैवत श्री पिंगळाक्षी देवीच्या सेवेत सेवाधारी समितीचा पुढाकार; चौथ्या माळेला १०१ लिटर दुधाच्या चहाचा प्रसाद वाटप !

रिसोड तालुका प्रतिनिधी :  शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री माता पिंगळाक्षी देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त पिंगळाक्षी देवी सेवाधारी समितीच्या वतीने चौथ्या माळेला १०१ लिटर दुधाच्या चहाचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव जपत समितीने यंदाही भाविकांची सेवा केली.

पिंगळा15956क्षी देवी सेवाधारी समिती सन २००५ पासून देवीच्या सेवेत कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही सेवापरंपरा आजही अखंडपणे सुरू असून, नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चहाप्रसादाचे वितरण करण्यात येते. चौथ्या माळेला १०१ लिटर दुधाच्या चहाचा प्रसाद वाटप करून समितीने सेवाभावाची परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे.

रिसोडचे ग्रामदैवत असलेल्या माता पिंगळाक्षी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होते. या काळात भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने सेवाधारी समितीचे कार्यकर्ते उत्साहाने पुढाकार घेतात. २००५ पासून सुरू असलेली सेवा, श्रद्धा आणि समर्पणाची परंपरा पिंगळाक्षी देवी सेवाधारी समितीने यंदाही कायम राखली.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर