Explore

Search

December 25, 2025 11:15 pm

नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा झेंडा !

शिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे या विजयी झाल्या असून शिरूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐश्वर्या पाचर्णे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विश्वासार्ह विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे शिरूर शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेच्या सदस्य निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. भाजपच्या तब्बल ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ०५ आणि महाविकास आघाडीला ०७ असे यश मिळाले आहे. काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून भाजपने अनेक प्रभागांमध्ये उत्तम यश मिळवले आहे.

प्रभागनिहाय निकाल पाहता, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना शह देत सर्वात मोठा विजय मिळवून बहुमताच्या दिशेने वाटचाल केली. मात्र राष्ट्रवादी (AP) यांचा नगराध्यक्ष निवडून आल्याने भाजप व मविआ यांना धक्का दिला आहे.

नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे यांची निवड झाल्यानंतर शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. या निकालामुळे आगामी स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची भूमिका अधिक मजबूत होणार असून शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर