Explore

Search

February 9, 2026 8:08 am

‘कोणीही मागे येऊ नका’… अजित पवार अचानक गायब, राजकारणात खळबळ !

पुणे : राज्यात महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवणार, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र या शक्यतेला दोन्ही गटांतील काही पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध दर्शवला. अखेर दोन्ही बाजूंच्या बैठका निष्फळ ठरल्या आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी मावळल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दिवसभराच्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेतला. यानंतर रात्री उशिरापर्यंत घटक पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू होती. पुण्यात महापालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या मार्गाने जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक झालेली हालचाल चर्चेचा विषय ठरली आहे. बारामती हॉस्टेलवरील बैठकीनंतर अजित पवार यांनी मोबाईल फोन बंद करत कोणालाही सोबत न येण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आणि ते एकटेच निघून गेले. विशेष म्हणजे, पायलट कार आणि सुरक्षा यंत्रणेलाही न घेता ते खासगी वाहनातून रवाना झाले. त्यामुळे नेमके बैठकीत काय घडले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यांच्या सुरक्षारक्षकांनाही ते नेमके कुठे गेले याची माहिती मिळू शकली नाही. याआधीही अजित पवार अशा प्रकारे अचानक संपर्काबाहेर गेले असताना राज्यात मोठे राजकीय बदल झाले होते, त्यामुळे यावेळीही घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, बारामती हॉस्टेलमधून ज्या वाहनाने अजित पवार रवाना झाले होते, ते वाहन पुण्यातील त्यांच्या जिजाई निवासस्थानी पोहोचल्याचे दिसून आले आहे. मात्र, अजित पवार प्रत्यक्षात तिथे आहेत की नाहीत, याबाबत कर्मचाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. यामुळे पुण्यात काहीतरी मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात असून, येत्या काही तासांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर