Explore

Search

October 17, 2026 4:50 am

रिसोड तालुक्यात दुष्काळाची भीषणता; आमदार अंबादास दानवे यांच्याकडून थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी !

रिसोड तालुका प्रतिनिधी ( रामेश्वर रंजवे ) : रिसोड तालुक्यात पावसाच्या मोठ्या ताणामुळे व तीव्र पाणीटंचाईमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. या बिकट परिस्थितीची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादासजी दानवे यांनी तालुक्यातील विविध भागांत दौरा करून दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान आमदार दानवे यांनी मांगवाडी (रामनगर) येथे थेट शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचून करपलेल्या पिकांची पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला. मांगवाडी येथील शेतकरी संजय देव्हारे यांच्या शेतात जाऊन त्यांनी पावसामुळे करपून गेलेली पिके आणि निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईची पाहणी केली. या वेळी त्यांनी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “या संकटसमयी शिवसेना पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वास आमदार दानवे यांनी या प्रसंगी दिला.

शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी

तालुक्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून, राज्य शासनाने विनाविलंब पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि संपूर्ण तालुक्यात दुष्काळग्रस्त सवलती त्वरित लागू कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार दानवे यांच्याकडे केली.

स्थानिक पदाधिकारी व शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

या पाहणी दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, गजानन देशमुख, गजानन दहात्रे, डॉ. चंद्रशेखर देशमुख, विश्वनाथ सानप, घनश्याम मापारी, नारायणराव आरू, संजुभाऊ इरतकर, आनंद कुळाल, गणेश देशमुख, डॉ. गजानन सानप, कैलास ठोकरे, धनंजय माळेकर, शंकर रेखे, शिवाजी सोनुने, रामेश्वर रंजवे, कैलास इप्पर, प्रदीप देशमुख, किशोर काळे, दिलीप चोपडे, आनंदा काळे, रामहरी सावके, रवी इरतकर, राजू इरतकर, गोपाल मोरे, पवन पौळ, नामदेव बोरुडे यांच्यासह मांगवाडी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर