Explore

Search

October 17, 2026 4:51 am

कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; 12 तासांत आरोपी जेरबंद !

रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या भांडणातून एका व्यक्तीवर कोयता, दांडा आणि काठीने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रांजणगाव येथील वामन वाईन्स अँड परमिटरूमसमोर पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून काही जणांनी एका व्यक्तीला कोयता, दांडा आणि काठीने हात, पाय तसेच डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, आरोपींनी त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या घटनेप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 445/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 109(1) तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर सूरज आप्पासाहेब कर्डिले (वय 19), संकेत भगवत कांबळे (वय 20), मयूर भागवत कांबळे (वय 24 ),रुपेश विजय मागीरवाड (वय 18 वर्षे 4 महीने ), गोरख विठ्ठल मोरे (वय 23) आणि अंकित प्रेमसिंग राठोड (वय 22) या सहा आरोपी यांना अटक करण्यात आले असून दोन विधीसंघर्षित बालकाना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यातील सनी जाधव, धनंजय साळुंखे, अमोल सुरवसे यांचा देखील सहभाग असून अद्याप हे तीन आरोपी फरार आहेत.

पोलिसांच्या तपासानुसार, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आणखी असल्याचे निष्पन्न झाले असून, 19 सप्टेंबर रोजी रात्री आणखी आरोपींना अटक करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. संदीप गिल्ल सो. पोलीस अधीक्षक सो.पुणे ग्रा. मा. शुभम कुमार सो. अपर पोलीस अधीक्षक पुणे, श्री. रविंद्र भोसले सो. उपविभागीय पो.अधिकारी, शिरूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर (स्था.गु.अ.शाखा), पोलिस निरीक्षक कुमार कदम, रांजणगाव पो.स्टे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश डोंगरे, सहा.फौज. संजय पडवळ, पो.हवा. तुषार पंधारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. संजय जाधव, पो.हवा. विकास पाटील, पो.हवा. राजू मोमीन, पो.कॉ. सागर धुमाळ तसेच रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे श्री. निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक, श्री. अविनाश थोरात पोलीस उपनिरीक्षक, श्री. भापकर पोलीस उपनिरीक्षक, सहा.फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, योगेश गुंड, दिपक ढवळे, पो.हवा. विकास आंबेकर, नितीन भोस, पो.कॉ. किशोर शिवणकर, पो.कॉ. केशव कोरेड, पो.कॉ. आकाश सवाणे, पो.हवा. नायकोडे, पांडुरंग साबळे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास श्री. निळकंठ तिडके पोलीस उपनिरीक्षक रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर