Explore

Search

October 17, 2026 5:28 am

पाचोऱ्यात एकलव्य संघटनेचा विविध मागण्यांसाठी ‘महा एल्गार’ !

पाचोरा : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) पाचोरा प्रांत कार्यालयावर अधिकार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित प्रशासनाकडे मोर्चातील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र, उर्वरित मागण्यांबाबतही तातडीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पवनराजे सोनवणे यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना पवनराजे सोनवणे यांनी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी यापुढेही आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले. समाजाच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मोर्चाला एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, जिल्हा सचिव दादाभाऊ बहिलम, जिल्हा संपर्कप्रमुख विजू गायकवाड, धर्माभाऊ भिल, करणभाऊ सोनवणे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनवणे, जिल्हा संघटक पिंटूभाऊ सोनवणे, भडगाव तालुका अध्यक्ष दशरथ मोरे, पाचोरा तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड, चाळीसगाव तालुका अध्यक्ष मोती पवार, एरंडोल तालुका अध्यक्ष जय मोरे, चाळीसगाव टायगर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण मालचे, राजूभाऊ जाधव, पाचोरा शहराध्यक्ष शांतारामभाऊ मोरे, पाचोरा मच्छीमार तालुका अध्यक्ष लक्ष्मण सोनवणे, पाचोरा ऊसतोड कामगार तालुका अध्यक्ष रवीभाऊ, भडगाव टायगर ग्रुप अध्यक्ष हिरामण सोनवणे, युवा तालुका अध्यक्ष पौलाद गायकवाड, पाचोरा-भडगाव संपर्कप्रमुख दगडू सोनवणे, चालक-मालक संघटना तालुका अध्यक्ष अनिल ठाकरे, कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष समाधान मोरे, पारोळा-एरंडोल संपर्कप्रमुख दत्तूभाऊ मोरे, कामगार तालुका अध्यक्ष रवींद्र माळी, ऊसतोड कामगार तालुका अध्यक्ष वाल्मीक सोनवणे, तालुका संघटक शिवदासभाऊ सोनवणे, कोळगाव गटप्रमुख नंदूभाऊ ठाकरे, भडगाव शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि भडगाव तालुका सचिव परमेश्वर गांगुर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोर्चात विविध समाजघटकांतील महिला व नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता संघटनेचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर