Explore

Search

October 17, 2026 4:51 am

तत्कालीन जिल्हाधिकारी, उपविभागीय (महसूल) अधिकारी व रिसोड तहसीलदार यांच्याविरुद्ध चौकशी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र !

रिसोड ( तालुका प्रतिनिधी) :रिसोड तालुक्यातील रयत क्रांती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष पंजाबराव देशमुख (रा. गोभनी, ता. रिसोड) यांच्याविरुद्ध तत्कालीन वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, उपविभागीय अधिकारी महसूल वैशाली देवकर मॅडम (वाशिम), व रिलोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी पंजाबराव देशमुख यांना गौण खनिज संदर्भात चुकीची कार्यवाही केली होती व त्या संदर्भात त्यांना हायकोर्टात जावे लागले होते.

तिथे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे पंजाबराव देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी तत्कालीन वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय दंडाधिकारी वाशिम, रिसोड च्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीची कार्यवाही केल्या संदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे पंजाबराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्राचे आदेशान्वये वाशिम चे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना पत्र आल्याचे पंजाबराव देशमुख यांनी सांगितले त्यानुसार वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी उप जिल्हाधिकारी (पुगे) वाशिम यांना त्या पत्रासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी पत्राद्वारे आदेश दिले आहे. असेच एक पत्र गौण खनिज कार्यालय अधिकारी यांना सुद्धा देण्यात आलेले आहे.

याबाबत सध्या कार्यरत असलेल्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली देवकर मॅडम व प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार रिसोड यांच्याविरुद्ध संबंधित तपास अधिकारी काय कार्यवाही करणार? हा प्रश्न कायम राहणार असल्याचे सध्या स्थितीवरून दिसते. कारण कोणत्याही अधिकाऱ्याची चौकशी त्या पदावर असल्यानंतर ती खऱ्या अर्थाने पूर्ण होईल का? हा प्रश्न संबंधित तक्रारदार वव जनता यांना पडलेला खरा प्रश्न आहे. त्यामुळे पदावर असतांना ती चौकशी कशी पूर्ण होईल ज्यांनी तक्रार केली त्यांना कोर्टाने निर्दोष ठरवले पण ज्यांनी तक्रार कर्त्यांना दोषी ठरवले, त्यांनी केलेल्या तक्रारीवर योग्य कार्यवाही होईल का? हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. तक्रारदाराला सुद्धा खऱ्या न्यायाची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम, हे न्याय देतील अशी अपेक्षा रयत क्रांती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष पंजाबराव देशमुख यांना आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर