Explore

Search

October 17, 2026 4:53 am

हरबळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रलंबित मागण्यांचा मुद्दा; ग्रामस्थांमध्ये नाराजी !

दिहरबळ ( प्रतिनिधी  २ ऑक्टोबर ) : लोहा तालुक्यातील हरबळ ग्रामपंचायतीच्या वतीने जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत गावातील विविध समस्या, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित विकासकामांवर चर्चा करण्यात आली. मात्र, मागील ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मागील ग्रामसभेत गावातील नाली सफाई, स्वच्छता, फवारणी, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत ग्रामस्थांनी मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले.यावेळी ग्रामसभेत नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. गावातील स्वच्छता, आरोग्य आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन विकासकामांना गती देण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.ग्रामस्थांच्या मागण्यांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून त्याबाबतची माहिती ग्रामसभेत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या प्रसंगी संदीप शिंदे, केरबा पा. शिंदे (रोजगार सेवक), ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर