वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी ) : रिसोड (जि. वाशिम) ग्राम रोजगार सहाय्यक संघटना, रिसोड तालुका, जि. वाशिम यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संदर्भात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रिसोड आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड यांना निवेदन देण्यात आले आहे.
संघटनेने म्हटले आहे की, ३ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णय जशाच्या तसा लागू करून ८००० + २००० रुपये मानधन डी.बी.टी. प्रणालीद्वारे वार्षिक स्वरूपात देण्यात यावे. जोपर्यंत जीआर लागू होत नाही तोपर्यंत मस्टर काढू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या – कारवाईचे अधिकार ५ तरतेंच्या जीआरनुसार लागू करणे, समूह दिवसाची अट रद्द करणे, अर्धवेळ सेवकांना पूर्ण वेळ करणे, विमा संरक्षण लागू करणे आणि ६० दिवसांच्या बंद कालावधीत पूर्ण मानधन देणे.

