Explore

Search

October 17, 2026 4:12 am

चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत; संदेश भोसले यांचा सेवाभावी उपक्रम!

कुंभोज ( हातकणंगले तालुका प्रतिनिधी ) : वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर आनंदाचे क्षण समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेण्याची संधी! याच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते तथा गोकुळ दूध संघाचे चेअरमन आदरणीय नविद मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश भोसले यांच्यावतीने सहारा सेवा आश्रम व पुनर्वसन केंद्र, कुंभोज येथे अन्नदान सेवेचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला.यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण यामुळे कार्यक्रमाला आपुलकीची किनार लाभली. वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभावी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श संदेश भोसले यांनी घालून दिला.

 

सहारा सेवा आश्रमाचे सर्वेसर्वा शकील नदाफ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नविद मुश्रीफ साहेब यांच्याकडून आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी दररोज पाच लिटर दूध उपलब्ध करून दिले जाते. त्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आधार मिळत असून, त्यांनी साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.याप्रसंगी गटनेते किरण माळी आणि संदेश भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाजातील गरजू व वंचित घटकांसोबत आनंदाचे क्षण साजरे करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि शक्य तितकी मदत करणे, हीच खरी सामाजिक सेवा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नेत्यावरील प्रेम, आदर आणि निष्ठा व्यक्त करताना सामाजिक उपक्रमातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न संदेश भोसले यांनी या माध्यमातून केला. वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या अन्नदान सेवेमुळे सामाजिक संवेदनशीलता, माणुसकी आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.या कार्यक्रमास अप्पासाहेब पाटील, अनिकेत चौगुले, अमर बंडगर, दिपक कोळी, पवन तानगे, उदय भोसले, शहानवाज मुजावर, गणेश भोसले, राजू पालखे, सज्जाद सुतार, राम डोणे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर