रायगड , प्रतिनिधी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘क्षयरोग मुक्त भारत – १०० दिवस मोहिमे’ अंतर्गत भारतीय महाक्रांती सेना आरोग्य विभाग , अष्टविनायक हॉस्पिटल (मोहपाडा, रसायनी), जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ /१०/ २०२६ रोजी चावनडोली उपकेंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ९० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.शिबिरात रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG), डॉक्टरांचा सल्ला, क्षयरोगाबाबत जनजागृती तसेच विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी अष्टविनायक हॉस्पिटल, मोहपाडा (रसायनी)येथे संदर्भित करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत मेस्त्री (MJPJAY विभाग, MOD – Manager On Duty) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासमवेत डॉ. प्रेम पोतदार , स्टाफ नर्स स्नेहल कांबळे, तसेच सहाय्यक अशोक उगलमुगले यांनी रुग्ण तपासणी व व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.तसेच चावनडोली उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य सेवक व आशा सेविका यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय सहकार्य केले. त्यांच्या समन्वयामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व आजारांचे वेळेत निदान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्थांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशी शिबिरे सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा भारतीय महाक्रांती सेना यांच्या कडे व्यक्त केली.

